एका शेतकऱ्याने काढलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऊसतोड झालेल्या शेताच्या बाजूच्या शेतात ही बिबट्यांची झुंज सुरू होती. शिरूर तालुक्यातील खंडाळे गाव परिसरात हा थरार पाहायला मिळाला. इथे बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत आहे.