राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आज पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामती परिषदेने देखील नामांकन पत्र भरण्याची संपूर्ण तयारी केली आहे. याबाबत उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यास कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ते सोडवण्यासाठी विविध प्रभाग निहाय कक्ष तयार केले आहे.संबंधित कक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.