काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी येथे विषारी दारू पिल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर हा विषारी दारूचा अड्डा अखेर गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आला.