सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्रात 'आयएनएस गुलदार ' ही युद्ध नौका पाच वाजता विसावली आहे. यासाठी एमटीडीसीचे अधिकारी आणि कर्मचारी गेले 48 तास काम करत होते. 48 तासाच्या प्रयत्नानंतर ही युद्धनौका खोल समुद्रात विसावली आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील निवती रॉक्सजवळ, सेवेतून निवृत्त झालेल्या आयएनएस गुलदार या युद्धनौकेच्या परिसरात भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळभित्ती विकसित केली जाणार आहे.आता ती पर्यटकांना लवकरच पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे.