जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील आर्यावर्त प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला अचानक आज सकाळच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण आहे की आगीचे लोड हे दोन ते तीन किलोमीटर वरून नागरिकांना दिसत असून या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकी आग कशी लागली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही तरी जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे.