मुंबई गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला रत्नागिरी जिल्ह्यात आग लागली. राजापूर तालुक्यातील पन्हाळे माळवाडी येथे ही घटना घडली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने टँकर जात होता. आग विझवण्यासाठी वेळीच यंत्रणा दाखल न झाल्याने स्थानिकांनी मग पुढील अनर्थ टाळण्यासाठी मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक थांबवली.