मे महिन्याच्या कडक उन्हात अग्निशमन कर्मचाऱ्यांकडून ‘पूर बचाव’ सराव सुरू आहे. उष्माघातापासून सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असलं तरी कर्मचाऱ्यांनाच उन्हात प्रशिक्षण देण्यात येत आहे. अग्निशमन दलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असताना प्रशिक्षणाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.