महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आरक्षण मर्यादेत आणि वाद नसलेल्या या जिल्हा परिषदांमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोग लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.