लातूर शहरासह जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आहे, या पावसाने लातूर शहरातल्या रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी झाले. बरकत नगर ते सिद्धेश्वर मंदिरच्या भागात रस्त्यावर असे तुंबलेल्या गटारींचे पाणी वाहू लागले होते. याच पाण्यातून नागरिकांना वाट काढत वाहने चालवण्याची कसरत करावी लागली आहे. पावसाळ्यापूर्वी तुंबलेल्या गटारांची स्वच्छता न केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.