भारताची पहिली स्वदेशी वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. नवीन दिल्ली स्थानकावर नुकतेच तिचे अनावरण झाले. लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी खास डिझाइन केलेल्या या ट्रेनमध्ये आरामदायक झोप, कमी आवाज आणि अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे. एकूण 16 डबे असलेल्या या ट्रेनचे सर्व तांत्रिक परीक्षण पूर्ण झाले आहे.