कोकणात पावसाची सुरुवात झाली आहे. मस्त आमरसाचे पाहुणचारही झाले आहेत. आता कोकणी माणूस मांसाहाराकडे वळला आहे. पण मासळी बाजारात जाताच ग्राहकांच्या कपाळाला आठ्या पडल्या आहेत. कारण कोकणात म्हावरं महागलंय. मासे महाग झालेत. मग खायचं तरी काय? असा प्रश्न कोकणी माणसाला पडला आहे.