वेंगुर्ल्यातील शिरोडा समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात बुडाली. या बोटीत एकाच कुटुंबातील तीघे मच्छीमार होते यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे तर एकजण समुद्रात बुडून बेपत्ता झाला आहे. शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग हे मच्छीमार बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.