अमरावतीकरांना गुलाबाच्या वेगवेगळ्या प्रजातीची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्यावतीने गुलाब उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ही विविध जातीची रंगीबेरंगी गुलाबांची रोपे गार्डनमध्ये ठेवण्यात आलेली आहेत.येथे वेगवेगळ्या प्रजातीचे शेकडो गुलाबांची झाडे असून गुलाब उत्सव संपल्यानंतर या झाडांचे याच ठिकाणी प्रत्यारोपण केले जाणार आहे.