नाशिकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्री आणि साधू-महंतांची उपस्थिती होती. ध्वजारोहण सोहळ्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या. त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पुढील धार्मिक पूजाविधी होणार आहे.