साताऱ्यातील कोयना बॅकवॉटर परिसरातील एमटीडीसी मुनावळे बोट क्लब परिसरात अत्यंत आकर्षक आणि दुर्मिळ अशा फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचं आगमन झालं आहे. या देखण्या आणि परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे परिसरातील पर्यटक, स्थानिक नागरिक आणि पक्षीप्रेमींमध्ये कमालीचा उत्सुकता पाहायला मिळाली.