मागील 8 दिवसांपूर्वी सीना नदीला आलेला पूर ओसरला गेला असून सीना नदी काठचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. या पुरामुळे नदी काठची शेती -पाईपलाईन- विद्युत मोटारी सर्व काही वाहून गेले आहे. विद्युत रोहित्र( लाईटचे dp ) देखील जमिनदोस्त झाले आहे.वाहून आलेली झाडे झुडपे देखील नदी काठी साठली गेली आहेत.