पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. इंदापूर आणि बारामती तालुक्यात पावसाचे प्रमाण खुप मोठे असून ढगफुटी सदृश्य पाऊस आहे.भिमानदीला मोठा पूर आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची दोन पथके बारामतीच्या रवाना झाली आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून रात्रीची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.