नाशिक मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील दुसरा मोठा पूर आला आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात बारा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे. तर संध्याकाळपर्यंत एकोणवीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा गोदापात्रात केला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.