नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार ते संततधार पाऊस सुरू असल्याने धरणांमधून सोडण्यात येणारे पूरपाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन सायखेडा गावात पूरपाण्याने शिरकाव केल्याने परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या कुटुंबांसह दुकानदारांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.