अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील दिघी कोल्हे या गावात रस्त्याला चक्क नदीचं स्वरूप आलं आहे. दिघी कोल्हे इथल्या नदीला पूर आल्याने पुराचं पाणी गावात शिरलं आहे. यामुळे प्रशासनाने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.