सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कन्हेर आणि धोम धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्यामुळे दोन्ही धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू केल्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगम असलेल्या संगम माहुली येथील छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.