दुष्काळाच्या झळा आता फुलशेतीलाही बसू लागल्या आहेत... अहिल्यानगर जिल्ह्यात पाण्याअभावी फुलशेती संकटात सापडली असून, फुलांचा सुगंध आता फिकट होण्याची वेळ आली आहे. दसरा-दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर फुलांना चांगली मागणी असतानाच, पाण्याअभावी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, उरलेली फुलशेती जगवण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर गाव हे फुलांचे आगर म्हणून ओळखले जात. संपूर्ण परिसरात फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.