मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटी परिसरातील उड्डाणपुलाच्या एका बाजूला अद्याप संरक्षण कठडा नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने आणि प्रवासी प्रवास करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब ठरत आहे.