प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेल्या माघ यात्रेचा सोहळा उद्या पंढरपूर मध्ये साजरा होत आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत आज दशमीच्या दिवशी सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरपुरातील मठ, मंदिर आणि धर्मशाळांमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे. उद्या पहाटे माघ एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची महापूजा होणार आहे विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास पाच तें सहा किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे. सध्या दर्शन रांगेत 50 हजाराहून अधिक भाविक आहेत. पंढरपूर शहरातील व मंदिर परिसरातील सर्व रस्ते भाविकांनी फुलून गेले आहेत. तर चंद्रभागा नदीचा तीरावर देखील वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे.