पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार, भाजप आमदार, महापौरांनी एकाच वाहनातून प्रवास केला. अक्कलकोट इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमासाठी या सर्वांनी एकत्र प्रवास केला. शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, भाजपा आमदार देवेंद्र कोठे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.