राज्यभरात सध्या डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात तीव्र जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे, खरीप हंगामाच्या तोंडावरच डिझेल मिळत नसल्याने शेतकरी आणि ट्रॅक्टर चालक त्याचबरोबर इतर वाहनधारक अडचणीत आले आहेत. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील एका पेट्रोल पंप चालकाकडून शेतकरी आणि वाहनधारकांसाठी पेट्रोल पंपावरच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.