बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. ही अडचण ओळखून ‘वन्यजीव सोयरे’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अभयारण्यात हजारो मातीचे पॉट लावले आहेत. या पॉटमध्ये नियमितपणे पाणी भरले जात असून दिवसभर पक्षी आणि लहान वन्यप्राणी यातून आपली तहान भागवत आहेत.