गोंदिया जिल्हा येथील नवेगावबांध जलाशय व परिसरातील तलावांमध्ये विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असून पक्षीप्रेमी, पर्यटकांसह छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तलाव परिसरात या पक्ष्यांचे थवे दिसत आहेत.