कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ओतूर येथे रस्त्याच्या कडेला दबा धरून मार्गावरून जाणाऱ्या दुचाकी चालकांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने या परिसरामध्ये पिंजरा लावला आहे. गेल्या पाच ते सहा दिवसापासून नगर महामार्गावर हा बिबट्या दबा धरून बसत आहे, यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहन चालकांवर भीतीचे सावट निर्माण झाले होते. यानंतर वन विभागाने या परिसरात ड्रोन कॅमेरा द्वारे बिबट्याचा शोध घेत असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.