जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर शिवारात गुरुवारी सकाळी एका शेतातील विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याची वनविभागाने चार तासांच्या थरारक रेस्क्यू मोहिमेनंतर सुखरूप सुटका केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिकारीच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.