जुन्नर तालुक्यातील पारगाव येथे बिबट जेरबंद झाला असून ७ वर्ष वयाचा नर प्रजातीचा हा बिबट्या आहे. या परिसरात बिबट्याने दोन दिवसांपूर्वी आठ वर्षाच्या मुलावर हल्ला करत भर दिवसा चिमुकल्याला ठार केलं होतं. त्यामुळे या बिबट्यांना जेरबंद करण्याच मोठं आव्हान वनविभागा पुढे होत. अखेर वन विभागाने दोन दिवसाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी तीन बिबटे जेरबंद केलेत, मात्र अद्याप ही या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने या बिबट्यांना ही जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागा पुढे असणार आहे.