कोरेगाव भिमा आणि वढु परिसरात वनविभागाने बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केलं आहे. कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारीला विजयस्तंभावर शौर्य दिन साजरा केला जातो. मात्र त्याआधीच बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मोठ्या कार्यक्रमाआधी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.