सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली भिसेवाडी येथील एका विहिरीत पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पडल्याची घटना घडली. इन्सुली येथील अमित धुरी यांच्या मालकीच्या विहिरीत सदर बिबट्या पडला होता. ग्रामस्थांच्या वतीनं याची माहिती वनविभागाला देण्यात आली, माहिती मिळताच वनविभागानं या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं.