अवघ्या 15 ते 20 दिवसांचं बिबट्याचं पिल्लू लांजा-पुनस-रत्नागिरी मार्गावर पुनस पुनस इथं सापडलं होतं. त्यानंतर जंगल परिसरात बिबट्याच्या पिल्लाला आईबरोबर पुनर्भेटीसाठी ठेवण्यात आलं होतं. परंतु, पिल्लाची आईशी भेट झाली नाही. त्यामुळे पिल्लाला लांजा वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. या पिल्लाची आईशी भेट न झाल्याने तब्बल 25 दिवसानंतर मुंबई-बोरिवली इथल्या संजय गांधी उद्यानात पाठवण्यात आलं आहे.