मजुरांना वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी लाखनी वनविभागाकडून तेंदूपत्ता मजुरांना मुखवटे देण्यात आले आहेत. तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी एकट्याने जंगलात न जाता समूहाने जावं आणि अंधारात न जाता दिवस उजेडात जावं, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसंच कोणतेही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती देण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.