चंद्रपूर शहर तिन्ही बाजूंनी घनदाट जंगलाने वेढले आहे. त्याचा फायदा म्हणजे उत्तम रानमेव्याची उपलब्धता.सध्या चंद्रपूरच्या बाजारपेठेत रानफळांची चांगलीच आवक बघायला मिळत आहे. शहरातील जटपुरा गेट परिसरात ग्रामीण भागातील विक्रेते टेंभरे आणि अन्य पारंपरिक रानफळे विक्रीसाठी घेऊन आले आहेत. या फळांच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. ही रानफळे नैसर्गिकरित्या जंगलात उगवणारी असून त्यामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणे, उष्णतेपासून संरक्षण करणे आणि ऊर्जा देणे यासाठी ही फळे उपयुक्त ठरतात.टेंभरे आणि चार ही फळे चवीलाही आगळीवेगळी असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत.