चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर रय्यतवारी कोळसा खाणीच्या बाह्य भागात चिखलात अडकलेल्या सांबराला वनपथकाने जीवदान दिले. गेले काही दिवस जिल्ह्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे कोळसा खाणीच्या आसपास चिखलाचे साम्राज्य आहे. अशातच जंगलातून भटकून बाहेर आलेला सांबर चिखलात अडकला होता. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या बचाव पथकाने धाव घेतली. सुमारे 2 तास प्रयत्नांची शर्थ करून वनपथकाने सांबराला बाहेर काढले. चंद्रपूरच्या वनपथकाच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.