पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा यांच्यावर त्यांचा मुलगा अकील अख्तरने गंभीर आरोप केले होते. मृत्यूपूर्वी त्याने एक व्हिडीओ रेकॉर्ड करत वडील आणि स्वत:च्याच पत्नीच्या अफेअरचा खुलासा केला होता. हा व्हिडीओ आता समोर आला आहे. 16 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा हरयाणातील पंचकुला इथल्या घरात अकीलचा संशस्यास्पद मृत्यू झाला होता.