बीड शहरातील मोंढ्यातून स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले चाळीस हजार रुपये चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. एकाने डिक्कीचे लॉक तोडले तर दुसऱ्या चोरट्याने पैसे ठेवलेली पिशवी लांबवल्याचे उघड झाले आहे.सोमवारी रात्री घडलेल्या प्रकारावरुन व्यापारी सुरज पाल यांनी पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.