साताऱ्याील फलटण तालुक्यातील जिंती आणि फडतरवाडीमध्ये चारशे वर्षाची परंपरा असलेल्या दोन्ही गावातील देवांच्या बंधू भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने गावच्या वेशीवर उपस्थित होते. जिंती इथल्या ग्रामदैवत जितोबा देवाची गावाबाहेर (वनभोजन) सणांची चारशे वर्षांची अनोखी परंपरा ग्रामस्थांनी यंदाही जोपासली आहे. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंदिर परिसरात दाखल झाले होते