विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी पंढरपुरातील चार प्रमुख यात्रांपैकी पहिली यात्रा असणाऱ्या चैत्री वारीसाठी लाखो भाविकांची पंढरपुरात गर्दी झाली आहे. हातात भगवी पताका आणि मुखी विठ्ठल विठ्ठल नाम घेत पंढरी नगरीत भक्तीचा महापुर आल्याचे चित्र असले तरी आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा थोडाफार फटका या यात्रेला बसला आहे