चाकण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या भोसे गावच्या हद्दीत एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरांनी चोरी केली आहे. त्यात एक मोटरसायकल, पंचवीस हजार रोख, किराणा मालाच्या दुकानातील साहित्य असा लाखोंचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत आहेत.