उत्तराखंडला पर्यटनासाठी गेलेले सोलापुरातील चार तरुण अडकले आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता या तरुणांनी कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे असून सुखरूप असल्याचे सांगितले होते. मात्र कालपासून चौघाचेही फोन लागत नसल्याने कुटुंबिय चिंतेत आहेत. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे या अडकलेल्या चौघाची नावे आहेत.