राजूर ते अहिल्यानगर निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस असून आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी शासकीय पातळीवर देखील हालचालींना वेग आला आहे. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर देवस्थान या ठिकाणी आंदोलन मुक्कामी होते. आज या ठिकाणाहून हे लाल वादळ थेट पालकमंत्री विखे पाटील यांच्या लोणी गावाकडे कूच करणार आहेत.