मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. कळंब - ढोकी महामार्गावर रस्त्यावर टायर जाळत मराठा आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केला. मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले. सकाळची वेळ असल्याने कर्मचारी विद्यार्थ्यांसह नागरीकांची मोठी गर्दी दिसून आली.