सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याची ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात सुगंधी चाफ्याच्या फुलांची आरास करण्यात आली आहे.श्रावण महिन्याला प्रारंभ झाला असून सध्या मंदिरांमध्ये उत्सव सुरू झाले आहेत. श्रावण महिन्याच्या आज दुसऱ्या दिवशी पिवळ्या व पांढऱ्या चाफ्याच्या पाच हजार फुलांपासून ही आरास करण्यात आली आहे. सातेरी मंदिरात श्रावण महिन्यात मंदिरात भजने सादर केली जातात.