पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यासोबतच उद्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमैनुएल मैक्रों हे देखील भारत दौऱ्यावर आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीआधी मुंबईतील वरळी सी लिंकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमैनुएल मैक्रों यांचा हस्तांदोलन करतानाचा डिजिटल फोटो लावण्यात आलेला आहे.