कोरेगाव शहरात शिवसेनेच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील ३० अंगणवाड्यातील ६०० विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे.