उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5 मधील भगवानदास हॉस्पिटलजवळ रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका तरुणाला काही अज्ञात युवकांनी अडवत तुला रोडवरून चालता येत नाही का? असा सवाल करत वाद घालण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणातच हाणामारीत बदलला. आरोपींनी संबंधित तरुणाला रस्त्यातच बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.