आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. याचबरोबर तुळशी पूजा, पाद्यपूजा आणि इतर विशेष पूजाही तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.